The Constitution of India
अनुच्छेद 371F
सिक्कीम राज्याबाबत विशेष तरतुदी.—या संविधानामध्ये काहीही असले तरी,
सिक्कीम राज्याबाबत विशेष तरतुदी.—या संविधानामध्ये काहीही असले तरी,— (क) सिक्कीम राज्याची विधानसभा तीसपेक्षा कमी नाहीत इतके सदस्य मिळून बनलेली असेल ; (ख) संविधान (छत्तिसावी सुधारणा) अधिनियम, 1975 याच्या प्रारंभाच्या दिनांकापासून (या अनुच्छेदामध्ये यापुढे "नियत दिन' म्हणून निर्देशिलेला),— (एक) एप्रिल, 1974 मध्ये सिक्कीममध्ये निवडणुका होऊन उक्त निवडणुकांमध्ये निवडून आलेले बत्तीस सदस्य (यात यापुढे विद्यमान सदस्य म्हणून निर्देशिलेला) असलेली सिक्कीमची विधानसभा ही, या संविधानान्वये रीतसर घटित करण्यात आलेली सिक्कीम राज्याची विधानसभा असल्याचे मानण्यात येईल ; (दोन) विद्यमान सदस्य हे, सिक्कीम राज्याच्या विधानसभेचे या संविधानान्वये रीतसर निवडून आलेले सदस्य असल्याचे मानण्यात येईल; आणि (तीन) सिक्कीम राज्याची उक्त विधानसभा, या संविधानान्वये एखाद्या राज्याच्या विधानसभेला असलेले अधिकार वापरील आणि तिची कार्ये पार पाडील ; (ग) खंड (ख) अन्वये सिक्कीम राज्याची विधानसभा म्हणून मानण्यात येणाऱ्या विधानसभेच्या बाबतीत, अऩुच्छेद 172 च्या खंड (1) मधील 2[पाच वर्षांच्या] कालावधीच्या निर्देशांचा अन्वयार्थ, 3[चार वर्षांच्या] कालावधीचे निर्देश म्हणून लावण्यात येईल आणि उक्त 3[चार वर्षांचा] कालावधी, नियत दिनांकापासून सुरू होतो, असे मानण्यात येईल; 171 (घ) संसदेकडून कायद्याद्वारे अन्य तरतुदी केल्या जाईपर्यंत, सिक्कीम राज्याला लोकसभेमध्ये एक जागा देण्यात येईल आणि सिक्कीम राज्य हा सिक्कीम संसदीय मतदारसंघ म्हणून संबोधला जाणारा असा संसदीय मतदारसंघ असेल ; (ङ) नियत दिनी अस्तित्वात असणाऱ्या लोकसभेतील सिक्कीम राज्याचा प्रतिनिधी हा, सिक्कीम राज्याच्या विधानसभेतील सदस्यांकडून निवडून दिला जाईल; (च) संसदेस, सिक्कीमच्या जनतेच्या विविध घटकांच्या हक्कांचे व हितसंबंधांचे संरक्षण करण्याच्या, प्रयोजनासाठी, सिक्कीम राज्याच्या विधानसभेमध्ये अशा घटकांच्या उमेदवारांकडून जितक्या जागा भरता येतील त्या जागांच्या संख्येसाठी आणि सिक्कीम राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी अशा घटकांच्या उमेदवारांना फक्त ज्या विधानसभा मतदारसंघांतून निवडणुकीसाठी उभे राहता येईल त्या मतदारसंघांचे परिसीमन करण्यासाठी तरतूद करता येईल; (छ) सिक्कीमच्या राज्यपालावर शांतता राखण्याबाबत आणि सिक्कीमच्या जनतेच्या निरनिराळ्या घटकांची सामाजिक व आर्थिक उन्नती सुनिश्चित करण्यासाठी समन्याय्य व्यवस्था करण्याबाबत विशेष जबाबदारी असेल आणि या खंडान्वये आपली विशेष जबाबदारी पार पाडताना सिक्कीमचा राज्यपाल, राष्ट्रपतीला योग्य वाटेल त्याप्रमाणे वेळोवेळी तो जे निदेश देईल, त्यांना अधीन राहून स्वविवेकानुसार कृती करील; (ज) नियत दिनाच्या लगतपूर्वी सिक्कीम शासनाच्या प्रयोजनार्थ, सिक्कीम शासनाच्या किंवा इतर कोणत्याही प्राधिकाऱ्याच्या किंवा कोणत्याही व्यक्तीच्या ठायी निहित असेल अशी सर्व मालमत्ता व मत्ता (मग ती सिक्कीम राज्यात समाविष्ट असलेल्या राज्यक्षेत्रांच्या आतील असो किंवा बाहेरील असो) नियत दिनापासून सिक्कीम राज्याच्या शासनाच्या ठायी निहित होईल; (झ) सिक्कीम राज्यामध्ये समाविष्ट असलेल्या राज्यक्षेत्रांमध्ये नियत दिनाच्या लगतपूर्वी उच्च न्यायालय म्हणून कार्य करणारे उच्च न्यायालय, नियत दिनी व तेव्हापासून सिक्कीम राज्याचे उच्च न्यायालय असल्याचे मानण्यात येईल; (ञ) सिक्कीम राज्याच्या संपूर्ण राज्यक्षेत्रातील सर्व दिवाणी, फौजदारी आणि महसुली अधिकारितेची न्यायालये, न्यायिक, कार्यकारी व प्रशासी असे सर्व प्राधिकारी आणि असे सर्व अधिकारी, नियत दिनी व तेव्हापासून या संविधानाच्या तरतुदींना अधीन राहून, आपापले कार्याधिकार बजावण्याचे चालू ठेवतील; (ट) सिक्कीम राज्यामध्ये समाविष्ट असलेल्या राज्यक्षेत्रांमध्ये किंवा त्याच्या कोणत्याही भागात नियत दिनाच्या लगतपूर्वी अंमलात असलेले सर्व कायदे सक्षम विधानमंडळाकडून किंवा अन्य सक्षम प्राधिकाऱ्याकडून सुधारण्यात येईपर्यंत किंवा निरसित होईपर्यंत तेथे अंमलात असणे चालू राहील ; (ठ) खंड (ट) मध्ये विनिर्दिष्ट केलेला असा कोणताही कायदा, सिक्कीम राज्याच्या प्रशासनाच्या संबंधात लागू करणे सुकर व्हावे यासाठी आणि अशा कोणत्याही कायद्याच्या तरतुदी या संविधानाच्या तरतुदींशी सुसंवादी करण्यासाठी राष्ट्रपतीला नियत दिनापासून दोन वर्षांच्या आत, आदेशाद्वारे, अशा कायद्यात आवश्यक किंवा समयोचित असतील अशी अनुकूलने व फेरबदल करता येतील—मग ते निरसनाच्या स्वरूपात असोत वा सुधारणेच्या स्वरूपात असोत—आणि तद्नंतर असा प्रत्येक कायदा याप्रमाणे केलेल्या अनुकूलनांसह व फेरबदलांसह प्रभावी होईल आणि असे कोणतेही अनुकूलन किंवा फेरबदल कोणत्याही न्यायालयात प्रश्नास्पद करता येणार नाही ; (ड) जो नियत दिनापूर्वी करण्यात किंवा निष्पादित करण्यात आला आहे आणि ज्यामध्ये भारत सरकार किंवा त्याच्या पूर्वाधिकाऱ्यांपैकी कोणतेही सरकार पक्षकार होते, असा सिक्कीमसंबंधीचा कोणताही तह, करारनामा, वचनबंध किंवा इतर तत्सम संलेख यांमधून उद्भवणारा कोणताही विवाद किंवा इतर बाब, यांच्याबाबत सर्वोच्च न्यायालयाला किंवा इतर कोणत्याही न्यायालयाला अधिकारिता असणार नाही ; पण या खंडातील कोणतीही गोष्ट, अनुच्छेद 143 च्या तरतुदींना न्यूनता आणते, असा तिचा अन्वयार्थ लावला जाणार नाही ; 172 (ढ) राष्ट्रपतीला, जाहीर अधिसूचनेद्वारे, अधिसूचनेच्या दिनांकाला, भारतातील एखाद्या राज्यात अंमलात असलेली अशी कोणतीही अधिनियमिती, सिक्कीम राज्यात त्याला योग्य वाटतील असे निर्बंध किंवा फेरबदल यांसह लागू करता येईल ; (ण) या अनुच्छेदाच्या पूर्वगामी तरतुदीपैंकी कोणतीही तरतूद अंमलात आणताना कोणतीही अडचण उद्भवली तर, राष्ट्रपतीला, 1आदेशाद्वारे, ती अडचण दूर करण्यासाठी त्याला आवश्यक वाटेल अशी कोणतीही गोष्ट (इतर कोणत्याही अनुच्छेदाचे अनुकूलन किंवा फेरबदल यांसह) करता येईल : परंतु असे की, नियत दिनापासून दोन वर्षे संपल्यानंतर, असा कोणताही आदेश, काढण्यात येणार नाही ; (त) सिक्कीम राज्य आणि त्यामध्ये समाविष्ट असलेली राज्यक्षेत्रे यांमध्ये किंवा त्यांच्या संबंधात, नियत दिनास सुरू होणाऱ्या व संविधान (छत्तिसावी सुधारणा) अधिनियम, 1975 याला राष्ट्रपतीची अनुमती मिळण्याच्या दिनांकाच्या लगतपूर्वी संपणाऱ्या कालावधीमध्ये केलेल्या सर्व गोष्टी व सर्व कार्यवाही, संविधान (छत्तिसावी सुधारणा) अधिनियम, 1975 याद्वारे सुधारणा केलेल्या अशा या संविधानाच्या तरतुदींशी अनुरूप असतील तेथवर, त्याप्रमाणे सुधारणा केलेल्या या संविधानान्वये वैध रीतीने केलेल्या आहेत, असे सर्व प्रयोजनांकरता मानले जाईल.]
पडताळणी प्रलंबित
हे का आहे
सिक्कीम, जो एके काळी चोग्याल (सम्राट) असलेले हिमालयीन राज्य व ब्रिटीशकाळातील संरक्षण कराराची स्थिती असलेला प्रदेश होता, 1975 मध्ये सार्वमतानंतर राजेशाही रद्द करून भारताचा भाग बनला. 36व्या घटनादुरुस्तीने कलम 371F घालून सिक्कीमचे सुलभ एकीकरण केले: विलीनीकरणापूर्वीची विधानसभा, न्यायालये, कायदे व मालमत्ता व्यवस्थांची सलगता राखली; राज्यपालांना सिक्कीमच्या नाजूक जातीय संतुलनाचा (भोत्यिया-लेपचा, नेपाळी-उत्पत्तीचे समुदाय आणि इतर) विचार करून शांतता व सामाजिक समता जपण्याची विशेष जबाबदारी दिली; आणि राष्ट्रपतींना संक्रमणातील अडचणी दूर करण्यासाठी तात्पुरती अधिकार दिले — ज्यांचा भाव संवेदनशील प्रदेशांसाठी असलेल्या विशेष तरतुदींप्रमाणे (कलमे 370 आणि 371-A ते 371-J) आहे.
न्यायालये याला कशी वाचतात
R.C. Poudyal v. Union of India (1993) या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने उपधारा (f) अंतर्गत जागा-आरक्षणाच्या सत्तेचा आढावा घेतला आणि संघ (बौद्ध मठीय) मतदारसंघ आणि इतर समुदायांसाठीचे आरक्षण वैध ठरवले; हे संसदेला सिक्कीमची वैशिष्ट्यपूर्ण सामाजिक रचना जपण्यासाठी दिलेल्या सत्तेचा योग्य वापर असल्याचे मानले, जरी त्यामुळे लोकसंख्येवर आधारीत कठोर समानतेपासून काहीसा अपवाद निर्माण झाला. न्यायालयांनी सर्वसाधारणपणे कलम 371F ला सिक्कीमसाठी स्वयंपूर्ण संक्रमणकालीन व संरक्षक आराखडा मानले आहे, ज्यात त्याच्या विशेष इतिहासाचा सन्मान केला जातो आणि नेहमीचे समानतेचे निकष तंतोतंत लागू केले जात नाहीत.
सामान्य गृहितके
धरण: कलम 371F सिक्कीमला कलम 370 ने जम्मू आणि काश्मीरला दिल्याइतकीच स्वायत्तता देते.
घटना: कलम 371F हे मुख्यतः कायदे, न्यायालये, विधानसभा यांची सलगता आणि समुदायाधिष्ठित जागा-आरक्षण यांना हाताळणारे संक्रमणकालीन व संरक्षणात्मक प्रावधान आहे; हे स्वतंत्र संविधान निर्माण करत नाही किंवा संसदेला सिक्कीमवर सर्वसाधारण कायदे करण्याच्या सत्तेवर तशी मर्यादा घालत नाही, जशी एकेकाळी कलम 370 मुळे जम्मू आणि काश्मीरवर होती.
धरण: राष्ट्रपतींना उपधारा (l) आणि (o) अंतर्गत कायदे बदलण्याची किंवा अडचणी दूर करण्याची जी सत्ताआहे ती कायमस्वरूपी आहे.
घटना: दोन्ही सत्तांना नियुक्त दिवस (1975) पासून दोन वर्षांची मर्यादा होती, त्यामुळे आज त्या लागू नाहीत.
धरण: संघासारख्या समुदायांसाठी केलेले जागा-आरक्षण ‘एक व्यक्ती–एक मत’ या समतेच्या तत्त्वाला बाधक आहे.
घटना: R.C. Poudyal v. Union of India या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने उपधारा (f) अंतर्गत सिक्कीमच्या विशिष्ट इतिहास व सामाजिक रचनेच्या पार्श्वभूमीवर ही आरक्षण-योजना वैध विशेष व्यवस्था म्हणून कायम ठेवली.