Skip to content
सं Samvidhan

The Constitution of India

अनुच्छेद 371D

आंध्र प्रदेश राज्याच्या किंवा तेलंगणा राज्याच्या] बाबत विशेष तरतुदी

2[आंध्र प्रदेश राज्याच्या किंवा तेलंगणा राज्याच्या] बाबत विशेष तरतुदी.—3[(1) आंध्रप्रदेश राज्याच्या किंवा तेलंगणा राज्याच्या गरजा लक्षात घेऊन, सार्वजनिक रोजगाराच्या बाबतीत आणि शिक्षणाच्या बाबतीत अशा राज्याच्या वेगवेगळ्या भागांतील लोकांना समन्याय्य संधी आणि सुविधा उपलब्ध करून देण्याकरता राष्ट्रपतीला प्रत्येक राज्याबाबत आदेश करून त्याद्वारे तरतूद करता येईल आणि राज्यांच्या वेगवेगळ्या भागांसाठी वेगवेगळ्या तरतुदी करता येतील.] (2) खंड (1) अन्वये केलेल्या आदेशाद्वारे, विशेषत,— (क) राज्य शासनाने, त्या राज्याच्या मुलकी सेवेतील पदांच्या कोणत्याही वर्गाची किंवा वर्गांची किंवा राज्याच्या नियंत्रणाखालील मुलकी पदांच्या कोणत्याही वर्गाची किंवा वर्गांची राज्याच्या वेगवेगळ्या भागांकरता वेगवेगळ्या स्थानिक संवर्गांमध्ये रचना करणे आणि अशी पदे धारण करणाऱ्या व्यक्ती, याप्रमाणे रचना केलेल्या स्थानिक संवर्गांना, आदेशात विनिर्दिष्ट करण्यात येतील अशा तत्त्वांनुसार व प्रक्रियेनुसार वाटप करणे हे आवश्यक करता येईल ; (ख) (एक) त्या राज्य शासनाच्या नियंत्रणाखालील कोणत्याही स्थानिक संवर्गातील (मग तो या अनुच्छेदाअन्वये आदेशानुसार रचना केलेला असो वा अन्यथा घटित केलेला असो) पदांवर थेट भरती करण्याच्या प्रयोजनार्थ; (दोन) राज्यामधील कोणत्याही स्थानिक प्राधिकरणाच्या नियंत्रणाखालील कोणत्याही संवर्गातील पदांवर थेट भरती करण्याच्या प्रयोजनार्थ ; आणि (तीन) राज्यातील कोणत्याही विद्यापीठामध्ये किंवा राज्य शासनाच्या नियंत्रणाधीन असलेल्या अन्य कोणत्याही शैक्षणिक संस्थेत प्रवेश मिळण्याच्या प्रयोजनार्थ, राज्याचा कोणता भाग किंवा कोणते भाग स्थानिक क्षेत्र म्हणून मानले जातील, ते विनिर्दिष्ट करता येतील; (ग) (एक) आदेशामध्ये यासंबंधात विनिर्दिष्ट करण्यात येईल त्या प्रमाणे, उप-खंड (ख) मध्ये निर्दिष्ट केलेल्या अशा कोणत्याही संवर्गातील पदांवर थेट भरती करण्याच्या बाबतीत; (दोन) आदेशामध्ये यासंबंधात विनिर्दिष्ट करण्यात येईल त्या प्रमाणे, उप-खंड (ख) मध्ये निर्दिष्ट केलेल्या अशा कोणत्याही विद्यापीठात किंवा अन्य शैक्षणिक संस्थेत प्रवेश देण्याच्या बाबतीत, अशा संवर्गाच्या, विद्यापीठाच्या, किंवा यथास्थिति, अन्य शैक्षणिक संस्थेच्या बाबतीत स्थानिक क्षेत्रात, आदेशामध्ये विनिर्दिष्ट केलेल्या कोणत्याही कालावधीपर्यंत जे राहिलेले असतील किंवा ज्यांनी अभ्यास केलेला असेल, त्या उमेदवारांना किंवा त्यांच्यासाठी, ज्या मर्यादेपर्यंत, ज्या रीतीने व ज्या शर्तींना अधीन राहून, प्राधान्यक्रम द्यावा किंवा आरक्षण ठेवावेत ती मर्यादा, ती रीत व त्या शर्ती विनिर्दिष्ट करता येईल. (3) राष्ट्रपतीला, आदेशाद्वारे, 4[आंध्र प्रदेश राज्याकरता व तेलंगणा राज्याकरता] एक प्रशासकीय न्यायाधिकरण घटित करण्यासाठी तरतूद करता येईल. ते न्यायाधिकरण, पुढील बाबींसंबंधात आदेशात विनिर्दिष्ट करण्यात येईल अशी कोणतीही अधिकारिता, अधिकार व प्राधिकार यांचा [ तसेच (सर्वोच्च न्यायालयाहून अन्य) कोणत्याही न्यायालयाला किंवा कोणत्याही न्यायाधिकरणाला किंवा अन्य प्राधिकरणाला संविधान (बत्तिसावी सुधारणा) अधिनियम, 1973 याच्या प्रारंभापूर्वी वापरता येत होती अशी कोणतीही अधिकारिता, अधिकार व प्राधिकार यांचासुद्धा ] वापर करील त्या बाबी अशा:— (क) आदेशात विनिर्दिष्ट करण्यात येईल त्या प्रमाणे, राज्याच्या कोणत्याही मुलकी सेवेतील पदांच्या वर्गात किंवा वर्गांमध्ये, अथवा राज्याच्या नियंत्रणाखालील अशा मुलकी पदांच्या वर्गात किंवा वर्गांमध्ये, अथवा राज्यातील कोणत्याही स्थानिक प्राधिकरणाच्या नियंत्रणाखालील अशा पदांच्या वर्गात किंवा वर्गांमध्ये नियुक्ती, वाटप किंवा पदोन्नती; (ख) आदेशात विनिर्दिष्ट करण्यात येईल त्याप्रमाणे, राज्याच्या कोणत्याही मुलकी सेवेतील पदांच्या वर्गात किंवा वर्गांमध्ये, अथवा राज्याच्या नियंत्रणाखालील अशा मुलकी पदांच्या वर्गात किंवा वर्गांमध्ये, अथवा राज्यातील कोणत्याही स्थानिक प्राधिकरणाच्या नियंत्रणाखालील अशा पदांच्या वर्गात किंवा वर्गांमध्ये नियुक्त केलेल्या, वाटप केलेल्या किंवा पदोन्नती दिलेल्या व्यक्तींची ज्येष्ठता; 169 (ग) आदेशात विनिर्दिष्ट करण्यात येईल अशा राज्याच्या कोणत्याही मुलकी सेवेतील पदांच्या वर्गात किंवा वर्गांमध्ये अथवा राज्याच्या नियंत्रणाखालील तशा मुलकी पदांच्या वर्गात किंवा वर्गांमध्ये अथवा राज्यातील स्थानिक प्राधिकरणाच्या नियंत्रणाखालील तशा पदांच्या वर्गात किंवा वर्गांमध्ये नियुक्त केलेल्या, वाटपप्राप्त नेमणूक केलेल्या, किंवा पदोन्नती दिलेल्या व्यक्तींच्या तशा इतर सेवा शर्ती. (4) खंड (3) अन्वये जो आदेश दिला जाईल,— (क) त्याद्वारे प्रशासकीय न्यायाधिकरणास, राष्ट्रपती आदेशात विनिर्दिष्ट करील अशी जी कोणतीही बाब न्यायाधिकरणाच्या अधिकारितेत येईल तिच्या संबंधीच्या गाऱ्हाण्यांचे निवारण करण्याविषयीची अभिवेदने स्वीकारण्यासाठी व त्यावर त्या प्रशासकीय न्यायाधिकरणाला योग्य वाटतील असे आदेश देण्यासाठी प्राधिकृत करता येईल ; (ख) त्यामध्ये प्रशासकीय न्यायाधिकरणाचे अधिकार, प्राधिकार व कार्यपद्धती यांबाबत राष्ट्रपतीला आवश्यक वाटतील अशा तरतुदी (आपल्या अवमानाबद्दल शिक्षा करण्याच्या प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या अधिकारासंबंधीच्या तरतुदींसह) अंतर्भूत असू शकतील; (ग) त्याद्वारे प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या अधिकारितेतील बाबीच्या संबंधातील आणि अशा आदेशाचा प्रारंभ होण्याच्या लगतपूर्वी (सर्वोच्च न्यायालयाहून अन्य) कोणतेही न्यायालय किंवा न्यायाधिकरण किंवा अन्य प्राधिकरण याच्यासमोर प्रलंबित असलेल्या कार्यवाहीपैकी आदेशात विनिर्दिष्ट करण्यात येतील अशा वर्गांतील कार्यवाही त्या प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे वर्ग करण्याची तरतूद करता येईल ; (घ) त्यामध्ये राष्ट्रपतीला आवश्यक वाटतील अशा पूरक, आनुषंगिक व परिणामरूप तरतुदी (फीबाबतच्या आणि मुदत, पुरावा यांबाबतच्या किंवा त्या त्या वेळी अंमलात असलेला कोणताही कायदा कोणत्याही अपवादांसह किंवा फेरबदलांसह लागू करण्याकरता केलेल्या तरतुदी यांसह) अंतर्भूत असू शकतील. *(5) कोणत्याही प्रकरणाचा अंतिम निकाल करणारा प्रशासकीय न्यायाधिकरणाचा आदेश हा, राज्य शासनाने तो कायम करणे किंवा आदेश केल्याच्या दिनांकापासून तीन महिने समाप्त होणे यापैकी जी अगोदर घडेल ती घटना घडल्यावर, प्रभावी होईल : परंतु असे की, राज्य शासनाला, लेखी विशेष आदेशाद्वारे व त्यात कारणे विनिर्दिष्ट करून त्या कारणास्तव, प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या कोणत्याही आदेशात तो प्रभावी होण्यापूर्वी, फेरबदल करता येईल किंवा तो रद्दबातल करता येईल आणि अशा बाबतीत, प्रशासकीय न्यायधिकरणाचा आदेश, अशा फेरबदल केलेल्या स्वरूपातच प्रभावी होईल, किंवा, यथास्थिति, मुळीच प्रभावी होणार नाही. (6) खंड (5) च्या परंतुकान्वये राज्य शासनाने केलेला प्रत्येक विशेष आदेश, तो करण्यात आल्यानंतर होईल तितक्या लवकर, राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहासमोर ठेवण्यात येईल. (7) राज्याच्या उच्च न्यायालयाला, प्रशासकीय न्यायाधिकरणावर अधीक्षण करण्याचे कोणतेही अधिकार असणार नाहीत आणि (सर्वोच्च न्यायालयाहून अन्य) कोणतेही न्यायालय किंवा न्यायाधिकरण प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या अधिकारितेच्या, अधिकाराच्या किंवा प्राधिकाराच्या अधीन असलेल्या किंवा त्याच्या संबंधीच्या कोणत्याही बाबीसंबंधात कोणतीही अधिकारिता, अधिकार किंवा प्राधिकार वापरणार नाही. (8) प्रशासकीय न्यायाधिकरणाचे अस्तित्व चालू ठेवण्याची आवश्यकता नाही, अशी राष्ट्रपतीची खात्री झाल्यास, राष्ट्रपतीला, आदेशाद्वारे, प्रशासकीय न्यायाधिकरण विसर्जित करता येईल आणि अशा विसर्जनाच्या लगतपूर्वी न्यायाधिकरणासमोर प्रलंबित असलेली प्रकरणे वर्ग करणे व निकालात काढणे यांकरता त्याला योग्य वाटतील अशा तरतुदी अशा आदेशात करता येतील. 170 (9) कोणत्याही न्यायालयाचा, न्यायाधिकरणाचा किंवा अन्य प्राधिकरणाचा कोणताही न्यायनिर्णय, हुकूमनामा किंवा आदेश काहीही असला तरी,— (क) (एक) 1 नोव्हेंबर, 1956 पूर्वी जसे अस्तित्वात होते तशा हैद्राबाद राज्याच्या किंवा त्यामधील कोणत्याही स्थानिक प्राधिकरणाच्या नियंत्रणाखालील कोणत्याही पदावर त्या दिनांकापूर्वी केलेली; किंवा (दोन) आंध्र प्रदेश राज्याच्या शासनाच्या अथवा त्यामधील कोणत्याही स्थानिक किंवा अन्य प्राधिकरणाच्या नियंत्रणाखालील कोणत्याही पदावर संविधान (बत्तिसावी सुधारणा) अधिनियम, 1973 याच्या प्रारंभापूर्वी केलेली, कोणत्याही व्यक्तींची नियुक्ती, पदस्थापना, पदोन्नती किंवा बदली; आणि (ख) उप-खंड (क) मध्ये निर्देशिलेल्या कोणत्याही व्यक्तीने किंवा त्या व्यक्तीसमोर केलेली कोणतीही कारवाई किंवा गोष्ट, केवळ अशा व्यक्तींची नियुक्ती, पदस्थापना, पदोन्नती किंवा बदली ही, अशा नियुक्तीच्या, पदस्थापनेच्या, पदोन्नतीच्या किंवा बदलीच्या संबंधात हैद्राबाद राज्यात, किंवा, यथास्थिति, आंध्र प्रदेश राज्याच्या कोणत्याही भागात रहिवास असल्याबाबत कोणत्याही आवश्यकतेची तरतूद करणाऱ्या त्या वेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यानुसार करण्यात आलेली नव्हती, एवढ्याच कारणावरून अवैध किंवा शून्यवत आहे अथवा कधीकाळी अवैध किंवा शून्यवत झाली होती, असे मानले जाणार नाही. (10) या अनुच्छेदाच्या व राष्ट्रपतीने त्याअन्वये केलेल्या कोणत्याही आदेशाच्या तरतुदी, या संविधानाच्या अन्य कोणत्याही तरतुदीत किंवा त्या त्या वेळी अंमलात असलेल्या अन्य कोणत्याही कायद्यात काहीही अंतर्भूत असले तरी, प्रभावी होतील.

पडताळणी प्रलंबित

हे का आहे

1956 मध्ये तेलंगणा व आंध्र प्रदेशाचे विलिनीकरण होऊन एकत्रित आंध्र प्रदेश राज्य निर्माण झाल्यानंतर, तेलंगणातील लोकांना अधिक विकसित किनारपट्टी आंध्र भागातून येणाऱ्या उमेदवारांमुळे शासकीय नोकऱ्या व महाविद्यालयीन प्रवेशात मागे पडण्याची भीती वाटू लागली. या भीतीतून ‘मुळकी’ चळवळ आणि ‘जय आंध्र’/‘जय तेलंगणा’ आंदोलने पेटली. 1973 मधील सहा-सूत्रीय समझोत्यामुळे संसदेनं संविधान (32nd Amendment) Act, 1973 मंजूर करून कलम 371D समाविष्ट केले, ज्यामुळे प्रदेशाधारित नोकरी व शिक्षण संरक्षणांना घटनात्मक हमी मिळाली आणि सेवा वाद जलद निपटावेत म्हणून स्वतंत्र प्रशासकीय न्यायाधिकरणाची निर्मिती झाली.

न्यायालये याला कशी वाचतात

P. Sambamurthy v. State of Andhra Pradesh (1987) या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने उपकलम (5) मधील राज्य सरकारला न्यायाधिकरणाच्या अंतिम आदेशात बदल/रद्द करण्याचा अधिकार देणारा भाग रद्द केला; कारण स्वतःच्याच प्रकरणात सरकारच न्यायाधीश होणे हे कायद्याचे राज्य व न्यायालयीन स्वायत्ततेच्या, जे संविधानाच्या आधारभूत संरचनेचा (basic structure) भाग आहेत, विरुद्ध आहे. L. Chandra Kumar v. Union of India (1997) मध्ये न्यायालयाने—कलमे 323A व 323B अंतर्गत असलेल्या समान न्यायाधिकरणांच्या संदर्भात—उच्च न्यायालयांचे कलम 226/227 अंतर्गत व सर्वोच्च न्यायालयाचे कलम 32 अंतर्गत असलेले न्यायालयीन पुनरावलोकन पूर्णपणे वर्ज्य करता येत नाही असे ठरवले; त्यामुळे उपकलम (7) मधील उच्च न्यायालयीन पर्यवेक्षणावरील बंदीची मर्यादा निश्चित झाली. 2014 मध्ये आंध्र प्रदेशाच्या विभाजनानंतर, या प्रदेशाधारित संरक्षणांचा लागू कसा करायचा याबाबत तेलंगणा आणि अवशिष्ट आंध्र प्रदेश या दोन्ही राज्यांमध्ये न्यायालये व सरकारला नव्याने विचार करावा लागला.

सामान्य गृहितके
  • धरण: कलम 371D मुळे राज्य सरकारला कुठल्याही वेळी मनमानीने न्यायाधिकरणाचे कोणतेही निर्णय उलथवण्याचा पूर्ण अधिकार आहे.

    घटना: P. Sambamurthy v. State of AP (1987) मध्ये सर्वोच्च न्यायालयाने हा अधिकार रद्द केला, कारण सरकारने आपल्या स्वतःच्या न्यायाधिकरणाचे निर्णय ओलांडणे अन्याय्य ठरते असे ठरवले.

  • धरण: कलम 371D मुळे न्यायालयांना न्यायाधिकरणाच्या निर्णयांचे पुनरावलोकन करण्याचा अधिकार पूर्णतः व कायमचा काढून टाकला आहे.

    घटना: L. Chandra Kumar v. Union of India (1997) मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ठरवले की, अशा विशेष न्यायाधिकरणांसाठीही उच्च न्यायालये आणि सर्वोच्च न्यायालय यांचा न्यायालयीन पुनरावलोकनाचा अधिकार पूर्णतः बाद करता येत नाही.