The Constitution of India
अनुच्छेद 288
पाणी किंवा वीज यांच्याबाबत राज्यांनी केलेल्या कर आकारणीपासून विवक्षित बाबतीत सूट
पाणी किंवा वीज यांच्याबाबत राज्यांनी केलेल्या कर आकारणीपासून विवक्षित बाबतीत सूट.—(1) राष्ट्रपती आदेशाद्वारे अन्यथा तरतूद करील त्याव्यतिरिक्त, या संविधानाच्या प्रारंभाच्या लगतपूर्वी अंमलात असलेल्या राज्याचा कोणताही कायदा हा, कोणतीही आंतरराज्यीय नदी किंवा नदी-खोरे याचे विनियमन किंवा विकास करण्याकरिता कोणत्याही विद्यमान कायद्याद्वारे किंवा संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे स्थापन केलेल्या कोणत्याही प्राधिकरणाने साठविलेल्या, निर्माण केलेल्या, वापर केलेल्या, वितरित केलेल्या किंवा विक्री केलेल्या कोणत्याही पाण्याच्या किंवा विजेच्या बाबतीत कर बसवणार नाही किंवा बसविणे प्राधिकृत करणार नाही. स्पष्टीकरण.—या खंडातील, “अंमलात असलेला राज्याचा कायदा” या शब्दप्रयोगात या संविधानाच्या प्रारंभापूर्वी पारित केलेला किंवा केलेला आणि तत्पूर्वी निरसित न केलेला राज्याचा कायदा, तो किंवा त्याचे भाग त्यावेळी मुळीच किंवा विशिष्ट क्षेत्रांमध्ये अंमलात नसले तरीही, समाविष्ट असेल. (2) राज्य विधानमंडळाला खंड (1) मध्ये उल्लेखिलेला असा कोणताही कर, कायद्याद्वारे बसवता येईल किंवा बसविणे प्राधिकृत करता येईल, पण असा कोणताही कायदा, राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवला जाऊन त्यास त्याची अनुमती मिळाल्याशिवाय तो कोणत्याही प्रकारे प्रभावी होणार नाही आणि जर कोणत्याही कायद्यामध्ये, अशा कराचे दर व अन्य आनुषंगिक गोष्टी कोणत्याही प्राधिकरणाने त्या कायद्यान्वये करावयाच्या नियमांच्या किंवा आदेशांच्या द्वारे निश्चित कराव्यात, अशी तरतूद केलेली असेल तर, त्या कायद्यामध्ये, असा कोणताही नियम किंवा आदेश करण्यासाठी राष्ट्रपतीची पूर्वसंमती मिळवली जाण्याची तरतूद करावी लागेल.
पडताळणी प्रलंबित
हे का आहे
स्वातंत्र्यानंतर भारताने बहुराज्य नदी प्रकल्प उभारायला सुरुवात केली — जसे भाखरा-नांगल धरण आणि Damodar Valley Corporation — जे राज्यांच्या सीमेपलीकडे पाणी व्यवस्थापन व वीज निर्मिती करतात. अशी नदी ज्या ज्या राज्यांतून जाते त्या प्रत्येक राज्याला पाणी किंवा वीज आपापल्या मर्जीने करपात्र करण्याची मुभा दिली तर सामायिक राष्ट्रीय संसाधनावर गोंधळात टाकणारे, अन्याय्य व परस्परविरोधी करभार निर्माण झाले असते. कलम 288 चे उद्दिष्ट असे प्रकल्प केंद्रीय समन्वयाखाली ठेवणे हे आहे — कोणताही राज्यकर या प्राधिकरणांवर लागू करण्यापूर्वी राष्ट्रपतींची मंजूरी बंधनकारक करून — ज्यामुळे सामायिक नद्यांचे व्यवस्थापन स्पर्धात्मक नव्हे तर सहकार्यात्मक पद्धतीने होईल.
सामान्य गृहितके
धरण: राज्यांना आंतर-राज्य नदी प्राधिकरणांकडील पाणी किंवा वीज यांवर कधीच कर लावता येत नाही.
घटना: लावता येतो, पण फक्त नव्या कायद्याद्वारे आणि तो कायदा उपधारा (2) नुसार राष्ट्रपतींची संमती मिळाल्यावरच.
धरण: संविधानापूर्वीचे जुन्या राज्यांचे करविषयक कायदे आपोआपच या प्राधिकरणांवर लागू होतात.
घटना: उपधारा (1) असे जुने कायदे लागू होण्यास आडकाठी घालते, जोपर्यंत राष्ट्रपती विशेषतः अपवादास मान्यता देत नाहीत.